तमाशासम्राट बाबुराव कुपवाडकर यांना कुपवाडमध्ये अभिवादन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/11/2026 2:32 AM



कुपवाड दि १,

तमाशासम्राट बाबुराव कुपवाडकर यांच्या 58 व्या पुण्यतिथीनिमित्त आज खुले नाट्यगृह कुपवाड येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.

 महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सांगली शाखा कार्यवाह अभिजीत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा  बाबूराव सर्वदे कुपवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 स्नेहजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांनी स्वागत केले. कुपवाडचे नाव कलाक्षेत्रात उज्वल करणाऱ्या कुपवाडकर यांच्या स्मृति जपण्यासाठी स्नेहजित प्रतिष्ठान  सर्वोतोपरी  काम करेल. कवी अभिजीत पाटील यांनी लिहिलेल्या  लावणींचे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदयही यावेळी श्री गौंडाजे  यांनी व्यक्त केला. 

यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मनोज बोरगावे, शांतिनाथ नरदेकर अझरुद्दीन मुजावर, मनोज आदाटे, तथास्तु  गौंडाजे उपस्थित होते   सचिव स्नेहल गौंडाजे यांनी आभार मानले.

यावेळी तमाशासम्राट बाबूराव सर्वदे कुपवाडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त खुले नाट्यगृहामध्ये प्रतिमापूजन करताना अभिजीत पाटील. शेजारी सन्मती  गौंडाजे, मनोज बोरगावे आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या