कुपवाड - दि.१,
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सांगली शाखेचे नूतन कार्यवाह झालेबद्दल कवी अभिजीत पाटील यांचा स्नेहजित प्रतिष्ठानमार्फत सत्कार करण्यात आला.
स्नेहजित प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांनी श्री.पाटील यांचा सत्कार केला. तमाशासम्राट बाबूराव कुपवाडकर खुले नाट्यगृहात सत्कार समारंभ झाला.
कुपवाडचे नाव साहित्य क्षेत्रात उज्ज्वल करणाऱ्या श्री. पाटील यांनी स्नेहजितच्या शब्दरत्न साहित्य संमेलन आयोजनास सातत्याने सहकार्य केले आहे, असे श्री. गौंडाजे यांनी सांगितले.
यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मनोज बोरगावे, शांतिनाथ नरदेकर अझरुद्दीन मुजावर, मनोज आदाटे, तथास्तु गौंडाजे उपस्थित होते सचिव स्नेहल गौंडाजे यांनी आभार मानले.
कवी अभिजीत पाटील यांचा स्नेहजित प्रतिष्ठान मार्फत सत्कार करताना सन्मती गौंडाजे.
शेजारी शांतिनाथ नरदेकर, मनोज बोरगावे, मनोज आदाटे आदी छायाचित्रात दिसत आहेत.