जिल्हा परिषदेत 4 ते 6 नोव्हेंबरदरम्यान उमेदचा दिवाळी महोत्सव;महिला बचतगटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ;नागरिकांनी भेट देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 03/11/2026 8:39 AM

नांदेड : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात 4 ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत भव्य दिवाळी महोत्सव व विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रदर्शनात महिला बचतगटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहउपयोगी साहित्य, विविध खाद्यपदार्थ, आकर्षक उत्पादने तसेच पारंपरिक दिवाळी फराळ विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, उत्पन्नात वाढ करणे आणि महिला उद्योजकतेला चालना देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामीण महिलांनी मेहनतीने तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी या दिवाळी महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी आणि महिला बचतगटांच्या उत्पादनांसह पारंपरिक फराळाची खरेदी करावी. यामुळे महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागेल, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक परीक्षित यादव आणि उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक बालाप्रसाद जंगीलवाड यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या