स्वताच्या मुलाने मिळवलेल्या यशाने प्रशिक्षक प्रशांत बामणे भावनिक, डोळ्यात तरंगले आनंदाश्रू...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/10/2026 12:43 PM

तब्बल २० वर्षे दुसऱ्या लेकरांच्या आनंदात आनंद मानणारे, त्यांना डोक्यावर घेऊन मिरवणारे जेंव्हा स्वःताच्या मुलाला विभागीय स्पर्धेत यश मिळते तेंव्हा कुठलाही माणूस भावनिक होणे स्वाभाविकच...

 भैरवनाथ स्पोर्टसचे प्रशिक्षक प्रशांत बामणे यांना स्वताच्या मुलाने मिळवलेले यश पाहून अत्यंतिक भावनिक होऊन त्यांनी त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यंदाच्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेत ५ किमी चालणे स्पर्धेत सुरज कुशवाह व वेदांत बामणे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितिय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत भैरवनाथ स्पोर्टसचा झेंडा गाडला.
 भैरवनाथ स्पोर्टस बामणोलीचे प्रशिक्षक प्रशांत बामणे हे गेली वर्षे मूलां-मुलींना मैदानात घाम गाळायला लावून विविध शासकीय सेवेते भरती करण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
त्यांच्या प्रशिक्षणाखाली अनेक मुले पोलिस  खाते, वनखाते, सैन्य विभाग, कारागृह पोलिस अशा विविध विभागात कार्यरत आहेत.

त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा...

Share

Other News

ताज्या बातम्या