राष्ट्रवादी काँग्रेस श. प. व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/04/2025 2:57 PM

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आरोग्य विभाग तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवकमार्फत मा.जिल्हाधिकारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल रुग्णालय प्रशासन तसेच संबंधितावर कारवाई करणेबाबत त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील धर्मादाय कार्यालयात नोंदणीकृत येणाऱ्या 30 रुग्णालयांना त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत सेवासंबंधी रुग्णांना दर्शनी भागी दिसेल असे फलक रुग्णालयात जाहीर लावणेबाबत आदेश करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहराध्यक्ष मा.नगरसेवक सागर घोडके,शरदचंद्र पवार पक्षाचे आरोग्य मित्रचे जिल्हाध्यक्ष उमर गवंडी,युवक सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण,
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,समाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे,सेवादल सांगली शहराध्यक्ष दत्ता पाटील,
सांगली महिला शहराध्यक्ष वैशाली धुमाळ,
संगीता जाधव,मुन्ना शेख,शीतल खाडे,
सरफराज शेख,अक्षय अलकुंटे, राहुल यमगर,
फिरोजा जमादार,पुजा आवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Share

Other News

ताज्या बातम्या