- भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी बेरोजगार होतकरु युवक,महिंलाना लहान मोठया व्यवसायाठी विनातारण आर्थिक भांडवल (कर्ज) उपलब्ध करून देणारी महत्वकांक्षी अशी पंतप्रधान मुद्रा योजना आणली. याला मोठा प्रतिसाद मिळाला. यातून देशात करोडो लोक चांगले व्यवसायिक यशस्वी उद्दोगपती झाले. या योजनेला आता 10 वर्ष पुर्ण होत आहेत. या योजने अंतर्गत आतापर्यंत विनातारण 33 हजार कोटी रुपयाच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. सांगली मध्येही दिपक माने हे या योजनेचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी वर अशासकीय सदस्य म्हणुन बरीच वर्षे काम केले आहे. या योजनेचा प्रसार, माहिती देऊन याचा लाभ सांगलीमधील हजारो गरजु होतकरू युवक महिलांना देऊन त्यांना उद्दोजक बनविणेसाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. काहींना लहान मोठे व्यावसायिक,उद्योजक बनवीले आहे.हे सर्व दिपक माने हे सामाजिक कर्तव्य म्हणुन पुर्णपणे मोफत व वेळ देऊन करत असतात. हरोजगार नसलेमुळे तसेच, होतकरू असुन ही उद्योगासाठी भांडवल नसलेमुळे यूवक गुन्हेगारी, व्यसनाधीनता, चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत. यामुळे समाजात अशांतता, कायदासुव्यस्थतेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून शासनाकडुन,आपल्या पोलिसखात्याकडुनही प्रबोधन ही चालुच असते. यामध्ये एक जागरूक भाजप पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता ,नागरिक म्हणुन दिपक माने यांनी योगदान देण्याची इच्छा आहे. व एक समाजासाठी नवीन विधायक सामाजिक उपक्रम सुरू करण्याचा भाजप नेते दिपक माने यांचा मानस व्यक्त केला. व यासाठी त्यांनी संदीप घुगे सो पोलिस अधीक्षक सांगली जिल्हा, सतिश शिंदे सो प्रमुख स्थानिक गुन्हा अन्वेषण सांगली जिल्हा या़ना निवेदन देऊन सामाजिक उपक्रमाची माहिती दिली पोलिस खात्याला होतकरू आहे पण बेरोजगारी व उद्योगासाठी भांडवल नाही म्हणुन युवक गुन्हेगारी, व्यसनाधीन, चुकीच्या गोष्टीत अडकले असतील असे निर्दशनास आले. तर हे भाजप नेते दिपक माने यांना सुचविले तर ते त्यांचे प्रबोधन करून उद्योगासंबधी त्यांना पंतप्रधान मुद्रा योजना व ईतर योजनेचीं माहिती, कागदपत्रांची माहिती देऊन व्यवसायासाठी विनातारण भांडवल (कर्ज) उपलब्ध करून देण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करतील याची त्यांनी ग्वाही दिली.त्यामुळे ते भरकटलेले युवक चांगल्या मार्गाला लागुन त्यांना व त्यांच्या कुंटुबाला आर्थिक स्थैय लाभेल. जेणेकरून ते गुन्हेगारी व वाममार्ग सोडतील. त्यामुळे समाजातही शांतता राहील. व गुन्हेगारीचेही प्रमाण कमी होईल. भाजप नेते दिपक माने यांच्या या उपक्रमाचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे व स्थानिक गुन्हा अन्वेषण प्रमुख सतिश शिंदे यांनी कौतुक केले. गुन्हेगारी ही सामाजिक समस्या आहे. अशा या उपक्रमामुळे नक्कीच गुन्हेगारी प्रवुत्ती कमी होण्यास मदत होईल. व वाट चुकलेल्या युवक चांगल्या उद्योग धंदयाला लागतील अशी आशा व्यक्त करुन सदर उपक्रमात पुर्ण सहकार्य करण्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आश्वासन दिले.