प्रति,
मा आयुक्त
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका.
विषय :- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात एकाच वेळी औषध फवारणी करणे बाबत (सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे)
महोदय,
आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
गेल्या वर्षी पर्यंत डासांचा उच्छाद कमी करण्यासाठी धूर फवारणी केली जात होती मात्र सदर धूर फवारणी चुकीची आहे असा निष्कर्ष निघाल्यामुळे धूर फवारणी बंद आहे असे कळते.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तसेच वादळी पावसाच्या लक्षणांमुळे ढगाळ वातावरण असते सदर परिस्थिती हे डासांची पैदास वाढवण्यासाठी उपयुक्त असते.
क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही सुचवल्याप्रमाणे मनपा क्षेत्रात एकाच वेळेला औषध फवारणी करून डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठीचा प्रयत्न केला जातो त्याला बऱ्याच अंशी यश मिळत असते
चालू वर्षी सुद्धा तात्काळ मनपा क्षेत्राचा एकाच वेळेला औषध फवारणी करण्यात यावी व डासांचा प्रादुर्भाव कमी करावा अशी विनंती आहे
राज्य सरकारने दिलेल्या 100 दिवसाच्या विविध उपक्रमा अंतर्गत सदर फवारणी करावी.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा