*क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव*
कुपवाड येथील राणाप्रताप मंडळाचे सचिव व खो-खो प्रशिक्षक संतोष कर्नाळे यांना श्री सुधर्मसागर प्रतिष्ठान व वीर सेवा दल शाखा कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने खो-खो खेळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 'वीराचार्य क्रिडा पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे औचित्य साधून कुपवाड येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन लाल मंदिराच्या प्रांगणात दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा.प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वंसत हंकारे, पोलीस उपनिरीक्षक दिपक भाडवलकर,आण्णासाहेब उपाध्ये,वीर सेवा दल संघनायक दिलीप कवठेकर, उपसंघनायक संजय हसुरे,सुधर्मसागर प्रतिष्ठानचे प्रमोद पाटील, रायगोंडा पाटील, बाहुबली पाटील, अमोल पाटील,डॉ.जयपाल चौगुले आंदिच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आले.
कुपवाड मधील राणाप्रताप मंडळाच्या माध्यमातून संतोष कर्नाळे यांनी गेली तीस वर्षापासून खेळाडूना खो-खो खेळाचे धडे देत आहेत. त्यांनी आतापर्यंत 500 हून अधिक राज्य खेळाडू व 80 हून अधिक राष्ट्रीय खो-खो खेळाडू घडवले आहेत. त्यांनी घडविलेले 50 हून अधिक मुले,मुली खेळाडू कोट्यातून शासकीय सेवेत आहेत. आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली राणाप्रताप खो-खो मैदानावर दररोज 150 हून अधिक खेळाडू सराव करतात. आजपर्यंत हजारो खेळाडू घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. क्रीडा क्षेत्रात केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल संतोष कर्नाळे यांची 'वीराचार्य क्रिडा पुरस्कार' देवून सन्मान करत असल्याचे संयोजक म्हणाले.
संयोजक सुधर्मसागर प्रतिष्ठान व वीर सेवा दलाचे पदाधिकारी सदस्य, 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन लाल मंदिर, 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर, 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर सदस्य वीर महिला मंडळ सदस्य व दिगंबर जैन समाजातील सदस्य व शहरातील विविध मंडळाचे व संस्थाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
'वीराचार्य क्रिडा पुरस्कार' मिळाल्याबद्दल राणाप्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील, उपाध्यक्ष अजित पाटील, रमेश पाटील, महेंद्र पाटील, संजय हिरेकुर्ब, विशाल बन्ने,शितल कर्नाळे,प्रा.विजय पाटील, सागर नरदेकर, प्रा.सचिन चव्हाण, सुनील सुतार, धनपाल आडमुठे सर,विजय पाडळे,राहुल गवळी, अनिल पाटील, शिवसागर पाटील, शेखर स्वामी,अभिजित सुतार,महेश करनाळे, वासुदेव जमदाडे, अक्षय पाटील, धनंजय पाटील, अमोल पाटील, शुभम पाटील, दिपक पाडळे आदिनी संतोष कर्नाळे यांचे अभिनंदन केले.