◆ महापालिका प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त विजया यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रार निवारण उपक्रमात मिरज सुधार समितीच्या वतीने शहरातील विविध प्रश्नांवर तक्रारीचा पाढा वाचण्यात आला. अतिक्रमण हटावमुळे रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बाबत महापालिका चालढकल करीत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
◆ मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी उपस्थित राहत नसल्याने कार्यालयातील कारभार रामभरोसे झाला आहे. अतिक्रमण, नगररचना, बांधकाम, आरोग्य विभागासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मिरज उपायुक्तांना न देता सांगली उपायुक्तांना का दिला आहे...? मिरजेचे उपायुक्त सक्षम नाही का...? असा सवाल उपस्थित केला.
◆ आयुक्त रविकांत अडसूळ येत्या काही दिवसांत यात नक्की सुधारणा करण्याचे आश्वासन मिरज सुधार समितीला दिले. महापालिका प्रभारी आयुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल मिरज सुधार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, अशोकसिंग रजपूत, अफजल बुजरूक, नरेश सातपुते, वसीम सय्यद, तौफिक देवगिरे, सलीम खतीब, शब्बीर बेंगलोरे, अझीम बागवान, संतोष जेडगे, अभिजित दाणेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.