संजयनगर परिसरांतील बेरोजगार तरुणांना विविध शासकीय योजनेतून कर्ज मिळवून देणार : भाजप नेते दिपक माने

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/04/2025 1:07 PM

भाजप नेते दिपक माने यांनी एक नवीन सामाजिक उपक्रम चालु केला आहे यामधुन बेरोजगारी, व्यवसायासाठी भांडवल नसलेने गुन्हेगारी कडे वळलेल्या होतकरू युवकांना पंतप्रधान मुद्रा योजना व विवीध शासकीय योजनेच्या माध्यमातून विनातारण भांडवल (कर्ज  स्वरुपात) उपलब्ध करुन देणार. सदर उपक्रमाबाबत  पोलिस निरीक्षक सुरज बिजली सो संजयनगर पोलिस ठाणे यांच्या सोबत चर्चा झाली. त्यांनी या उपक्रमाचे अतिशय कौतुक केले.  अशा सामाजिक उपक्रमाची समाजाला  खरी गरज असलेचे बिजली साहेबांनी सांगितले.  व या सामाजिक उपक्रमामुळे संजयनगर परिसरातील गुन्हेगारी प्रवुत्ती कमी होण्यास नक्की मदत होईल. सदर सामाजिक उपक्रम संजयनगर पोलिस ठाणे हद्दीत संजयनगर पोलिस व भाजप नेते दिपक माने यांची टीम संयुक्त पणे राबवु असे सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या