सांगली - पेठ रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे वहानधारकांनी काळजी घेण्याची गरज

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/04/2025 11:34 AM

सांगली ते पेठ रस्ता आता सुसाट बऱ्यापैकी झालेला आहे.
लक्ष्मी फाटा येथे दोन्हीकडून भरमसाठ स्पीडने वाहने येत असतात समडोळी कवठेपिरान दुधगाव सावळवाडी माळवाडी या ठिकाणचे येणारे ग्रामस्थ व सांगली पेठ रस्त्यावर वाहतूक करणारे वाहतूकदार यांचे मोठ्या प्रमाणात अपघात सदर ठिकाणी होताना दिसत आहे.
त्यामुळे लक्ष्मी फाट्याजवळ तिन्ही बाजूला स्पीड बेकर करणे आवश्यक आहे व वाहतूक नियमाचे पालन करण्यासाठी बोर्ड लावणे आवश्यक आहे 
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही कळवलेला आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना कराव्यात.
 समाज माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना विनंती करत आहोत आपण तात्काळ सदर ठिकाणी योग्य त्या खबरदारी घेऊन होणारे अपघात टाळावेत.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या