सांगली शहरातील आमराई मध्ये डांबरी रस्ता करून जेम तेम वर्ष दीड वर्षे झालेली आहेत.
सदर कामाची डिफेक्ट लायबिलिटी कार्यकाळ अजून पूर्ण झाला नसताना सदर ठिकाणी परत हॉट मिक्स काम करण्याचे चालू आहे .
अमरावती नागरिकांनी आमच्या चांगला रस्ता असताना रस्त्यावर रस्ता पुण्याचे चुकीच्या पद्धतीने काम चालू असल्याबद्दल नागरिक जागृती मंचेकडे आज याबाबत तक्रार केलेली आहे.
आमराई मध्ये दुपारच्या वेळेला नशेखर मुलं येऊन तोडफोड करतात दंगा भांडण होतात त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत त्यावर कारवाई होताना दिसत नाही.
तसेच ड्रेनेचे पाणी बाहेरून साचून राहते त्याबाबत कार्यवाही नाही.
ओपन जिम खराब झालेले आहे त्याबाबत कार्यवाही नाही.
आमराई मधील टॉयलेट स्वच्छ नसते त्याबाबत तक्रारी आहेत त्यावर कारवाई नाही.
नवीन प्लांटेशन केले जात नाही त्यावर कार्यवाही नाही.
गरज नसताना कोणाच्या तर फायद्यासाठी अशा पद्धतीने उधळपट्टी चालू आहे त्याला विरोध आहे.
सतिश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली