महापालिका जनरल फंडातील विकास कामे मंजूर करत असताना यापूर्वी विविध आदेशानुसार प्रथम महापालिका आयुक्तांची तत्वतः मान्यता घेण्याची आवश्यकता नाही असे आदेश निर्गमित करण्यात आले होते.
सदर आदेश या आदेशानुसार रद्द करण्यात येत आहेत.
यापुढे जनरल फंडामधील विकास कामे मंजूर करत असताना खालील प्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेले आहे.
विकास कामाबाबत कोणतीही मागणी आल्यास त्यावर महानगरपालिका आयुक्तांचा शेरा झाल्यानंतर ते पत्र संबंधित विभागाकडे नोंदवून दिले जाईल.
संबंधित विभाग प्रमुख यांनी सदर कामाची आवश्यकता असलेबाबत स्थळ पाहणी करून काम करणे आवश्यक असल्यास, त्याचे अंदाजपत्रक बनवून फाईल संबंधित विभागामार्फत नियंत्रण अधिकाऱ्यांच्या अभिप्रायासह लेखा व वित्त विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.
लेखा व वित्त विभागाने या फाईलवर विभागाने सुचवलेल्या लेखाशीर्षामध्ये तरतूद किती आहे, खर्च किती झालेला आहे व शिल्लक किती राहिलेला आहे, फक्त याच गोष्टीची नोंद करून फाईल लेखापरीक्षण विभागाकडे सादर करून लेखापरीक्षण विभागामध्ये फाईल आल्यानंतर या फाईलबाबत आवश्यक वित्तीय कार्यपद्धती, शासन निर्णय, लेखासंहिता व विविध वित्तीय मार्गदर्शक सूचना यांच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अभिप्राय देऊन मान्यतेसाठी सक्षम प्राधिकारी कोण आहे, याचा उल्लेख करून नस्ती सक्षम प्राधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर या पुढे बंधनकारक आहे.
सक्षम प्राधिकाऱ्याकडे फाईल आल्यानंतर आवश्यकतेनुसार स्थळ पाहणी करून कामाची गरज विचारात घेता कामास फाईलवर मंजुरी घेऊन फाईलवर मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित विभागाने मान्यता आदेश तयार करुन, अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देवून, लेखा व वित्त विभागातून प्रस्तावित लेखाशीर्षात सदर रक्कम खर्ची टाकून त्याची प्रिंट आणि काम मंजूरी आदेश व तांत्रिक मान्यता आदेश फाईल सोबत जोडून फेरसादर करणे आवश्यक आहे.
सदर आदेशाची अंमलबजावणी आज दि ११/४/२०२५पासून करण्यात येणार आहे,