*कुपवाड शहरांमध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समितीतर्फे आयोजित रामनवमी ते हनुमान जयंती पारायण सोहळ्यामध्ये आज ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली.*
*पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब पाटील,महादेव कोरे, शंकर पाटील, गंगाधर पाटील, बापूसो तोडकर,अजित हिंगमिरे,योगेश हिंगमिरे, विजयदादा खोत, नितीन कारंडे, कुमार पाटील, चंद्रकांत तोडकर व पारायण सोहळा समितीचे सर्व सदस्य, महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*
*गाव भागातून निघालेल्या दिंडीचे घरोघरी नागरिकांनी महिलांनी रांगोळ्या काढून ओवाळून स्वागत केले..*
* आज दिनांक शनिवार 12.4.2025 हनुमान जयंती निमित्त भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पारायण कमिटीतर्फे अध्यक्ष दादासाहेब पाटील सर्व संचालकांनी केले..*