सांगली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या
काही मागण्या प्रलंबित असून यावर विचार मंथन तसेच महासंघाच्या संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यासाठी कार्यकारणी पदाधिकारी व सभासदगण यांची २७ एप्रिल २०२५ ला रोज रविवारला श्रमिक पत्रकार संघ, सदाशिव पेठ, पुणे येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत बैठक आयोजित केली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे हे सभेच्या अध्यक्षस्थानी राहतील. सभेत संघटनात्मक बाबीवर चर्चा आणि केंद्र व राज्य सरकारशी संबंधित प्रलंबित मागण्यांवरविचार विनिमय तसेच दिनांक ७ ऑगस्ट २०२५ ला गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहावे राष्ट्रीय महाअधिवेशनावर चर्चा केली जाईल. सभेला राष्ट्रीय ओबीसी महासंघ, महिला महासंघ, किसान महासंघ, युवा, युवती महासंघ, विद्यार्थी महासंघ, कर्मचारी महासंघ, वकील महासंघ, सर्व पदाधिकारी व सभासदगण यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.