सांगली : सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारने सातत्याने महागाई वाढविल्या बद्दल त्याच्या निषेधार्थ आज निषेध आंदोलन करण्यात आले.
जीवनावश्यक वस्तूचे दर गगनाला भिडले असताना तसेच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला नुकत्याच केंद्र सरकारने स्वयंपाक गॅसदर मध्ये मोठी वाढ करून भरीस भर घातली आहे. ही अन्यायी दरवाढ त्वरित मागे घ्यावी याबाबत मा .जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दरवाढीविरुद्ध निषेध करून आंदोलन करण्यात आले.
वास्तविक नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य व केंद्र सरकारने महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात महागाई कमी न करता दिवसां दिवस वाढ होत चाललेली आहे त्यातच घरगुती वापरातील गॅस दर वाढूवून महिलांचे बजेट कोलमडले आहे . एकीकडे योजनांची खैरात वाटायची व दुसरीकडे महागाई वाढवून यांचे पैसे वसूल करायचे असा कारभार सत्ताधाऱ्यांचा चालू आहे अशी भावना यावेळी महिला पदाधिकारी यांनी व्यक्त केली.
यावेळी महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, महिला शहरजिल्हाध्यक्ष संगिता हारगे ,प्रदेश सरचिटणीस ज्योती अदाटे ,उज्वला पाटील, डॉ छाया जाधव , मृणाल पाटील,वैशाली धुमाळ ,चारुलता पाटील,शारदा माळी, ,प्रतिभा पाटिल
प्रियांका विचारे, तेजश्री बोंडे ,
रईसा चिंचणीकर ,स्मिता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.