विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आपल्या राज्यात प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न चालू होते मात्र स्वर्गीय प्रतापराव होगाडे यांच्याबरोबर सांगलीत सर्व पक्ष कृती समितीची व्यापक मीटिंग घेतली व सदर प्रीपेड स्मार्ट मीटर किती चुकीचे व ग्राहकांच्यावर अन्याय करणारे आहे तसेच त्यामध्ये राज्याचा 16000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळे तसेच लोकसभेला महायुती सरकारला आलेला अपयश या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने तात्पुरती सदर विषयाला स्थगिती दिली मात्र आता निवडणुका झाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने स्मार्ट मीटर ग्राहकांना न सांगता परस्पर बसवण्याचे कटकारस्थान चालू आहे.
त्यासाठी गोंडस प्रचार केला जातो की आता रीडिंग घ्यायला माणूस तुमच्या घरात येणार नाही
तुम्हाला रोजच्या रोज किती रीडिंग झाला हे तुम्हाला ऑनलाईन कळेल.
त्यामुळे तुमचा रोजचा वापर तात्काळ कळेल
मात्र हेच मीटर आदानी समूह बसवत आहे.
यामध्ये आता स्मार्ट मीटरच्या गाजर दाखवायचं आणि थोड्याच दिवसात परत सदर मीटर प्रीपेड करायचं.
ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत त्या ठिकाणी पूर्वीच्या मीटर मध्ये वीज वापर कमी होत होता मात्र सध्याच्या स्मार्ट मीटरमुळे विजेचा वापर किंवा विजेचे युनिट वाढलेले दिसत आहे ही काय भानगड आहे कळाला मार्ग नाही.
तरी ह्या माध्यमातून आम्ही आपणास आवाहन करत आहोत स्मार्ट मीटर बसवायला आल्यानंतर त्याला विरोध करा ज्या ठिकाणी परस्पर स्मार्ट मीटर बसवून गेलेले आहेत त्या ग्राहकांनी आपल्या नजीकच्या महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाऊन तक्रार अर्ज द्या आम्हाला सदर स्मार्ट मीटर नको आहे तसेच तुम्ही ते मीटर तात्काळ बदलले नाही तर आम्ही बिल भरणार नाही व याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची राहील
त्याबाबत आपणास काही समस्या आल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
सतीश साखळकर उमेश देशमुख महेश खराडे अभिजीत भोसले हनमंतराव पवार शंभूराज काटकर रुपेश मोकाशी डॉक्टर संजय पाटील आसिफ बाबा लालू मिस्तरी वि द बर्वे मयूर बांगर अवधूत गवळी
सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा