परतवाडा : धर्म राज्य भेद मानवा नसावे! सत्याने वागावे! ईशासाठी!! निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक!भांडणे अनेक! कशासाठी?!!
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अचलपूर परतवाडा शहरात "क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती" समारोह साजरा करण्यात येत आहे. हा कार्यक्रम पूर्णतः लोकवर्गणीतून घेतल्या जातो. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्याख्यान असून ते या जुळ्या शहरात घेतले जाते. ही या जुळ्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे. सर्व वर्गणीदार ह्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. सदर जयंती समारोहातील जाहीर व्याख्यानाला उत्कृष्ट दर्जा असतो.
दि.11 एप्रिल 2025 शुक्रवार रोजी ''फुले दाम्पत्याची सत्यशोधक विचारधारा - राष्ट्राचे वैभव" या विषयासाठी आंतरराष्ट्रीय व्याख्याते प्राध्यापक व समन्वयक फ्रेंच उच्च शिक्षण न्यू दिल्लीचे मा.डॉ.शरद प्र. बाविस्कर यांचे प्रमुख वक्ते म्हणून आपल्या शहराला लाभले आहे.
सदर लेखात डॉ.बाविस्कर यांचे बद्दल सांगायचे झाल्यास त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील रावेर येथे झाला त्यांनी जेएनयु विद्यापीठातून तत्वज्ञान या विषयात पीएचडी केली आहे त्यांनी युरोपियन मानवीकी,क्रॉसवे मध्ये एकाधिक मास्टर्स केले आहेत, जे एम.फिल. च्या समकक्ष मानले जाते.
कार्य आणि लेखन- ते सध्या जेएनयू विद्यापीठ दिल्ली येथे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी "भुरा" नावाने एक आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.जे त्यांचे जीवनातील अनुभवांवर आधारित आहे. त्यांच्या लेखनातून शिक्षण धोरणांमधील त्रुटी आणि भाषेच्या समस्यावर प्रकाश पडतो त्यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानावर अनेक लेख लिहिले आहे. हे लोकसत्ता ह्या वर्तमानपत्र प्रसिद्ध झाले आहे.त्यांचे लेखन विविध विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.डॉ. विलास पां.बनसोड अभ्यासक "राजश्री शाहू महाराजांचे आर्थिक धोरण" लाभलेले आहेत. तसेच कार्यक्रमाची सुरुवात बहुजन चळवळीतील सत्यशोधक महानायक महानायिका वेशातील कलाकारांचे आकर्षक बक्षिसांसह वेशभूषा स्पर्धेने होईल.
सदर कार्यक्रमाचा वेळ सायंकाळी 6:00 वाजता व वयोमर्यादा 10 ते 25 असेल. सदर कार्यक्रमाला सहयोग राशी QR कोड ने देता येईल.
पूर्वीच्या कार्यक्रमाचे फोटोग्राफ, व्हिडिओज सदर NEWS यामध्ये आपणास पाहता येईल.
या कार्यकमाला समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे..
कार्यक्रमाचे स्थळ : कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर परतवाडा दि.11 एप्रिल 2025 शुक्रवार वेळ- सायंकाळी 7.00 pm वाजता.
आयोजक: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारोह समिती - 2025