भगवान महावीर जयंतीच्या निमित्त जैन समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील श्रावकांनी हजेरी लावली.
पहाटे पार्श्वनाथ मोठी बस्ती लाल जिन मंदिर आदीनाथ मंदिर येथे महावीरांचा जन्म कल्याण विधी, पाळणा विधी पार पडला दुपारनंतर पालखी सोहळा शोभायात्रा वाद्याच्या निनादात मोठी बस्ती चौक, लाल बस्ती, कवठेकर गल्ली उल्हासनगर मुनीगुंफा येथे जाऊन मंत्र अभिषेकाने पूजा करण्यात आली.तेथून परत मंगळवार पेठ मेन रोड दर्गा चौक चावडी चौक येथून मंदिरामध्ये परत आली याप्रसंगी तिन्ही मंदिराचे पंच वीर सेवा दल वीर महिला मंडळ महिला मंडळ श्रावक श्रावीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.