मनापच्या आर्थिक स्त्रोताचा विचार करूनच केंद्र सरकारने प्रस्तावित इ - बससेवा दर ठरवावे : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/04/2025 1:38 PM

कालच्या दैनिक पुढारी मधून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मा पंतप्रधान ही बस सेवा माध्यमातून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला 50 ई बस मिळणार आहेत सुरुवातीला मनपा क्षेत्र व शेजारच्या ग्रामीण भागासाठी इलेक्ट्रॉनिक एसी बस मिळणार आहेत म्हणून आनंद वाटला सदर योजना आपल्या शहरात सुद्धा सुरू व्हावी अशी आमच्यासारख्या असंख्य नागरिकांची इच्छा होतीच...
मात्र सदर योजना ही खाजगीकरण अंतर्गत चालवली जाणार आहे त्याबाबत 45 सीटच्या गाडीला साधारण 74 रुपये किलोमीटर व 35 सीटच्या गाडीला साधारण 65 रुपये किलोमीटर असे गाडी भाडे आकारले जाणार आहे 
सर्वसाधारण आत्ता ज्या खाजगी गाड्या डिझेलवर चालवल्या जातात त्यांचा साधारण खर्च पर किलोमीटर 35 ते 45 रुपये येत आहे मग ही बससाठी ज्यादा खर्च येण्याचे कारण कळत नाही.
व याबाबत जाणकार व्यक्तीने मार्गदर्शन करावे 
नाहीतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या कोणत्याही योजना या पांढरा हत्ती पोस ल्याण्याप्रमाणेच झालेले आहेत.
आधीच आपली ड वर्ग महापालिका आहे उत्पन्नाच्या नावाने बोंबाबोंब आहे त्यात भ्रष्टाचार चा आहाकार माजलेला आहे त्यात ई-बसची सेवा चांगल्या पद्धतीने ठेवायची असेल तर या दराच्या बाबत पुनश्च एकदा महापालिकेने राज्य सरकार अथवा केंद्र सरकारशी प्रति किलोमीटर दराबाबत पत्रव्यवहार करावा अशी विनंती आहे 
तसेच केंद्र सरकारने सुद्धा दरपत्रक ठरवताना किंवा खाजगी कंत्राटदार ठरवताना महापालिकेच्या आर्थिक स्त्रोताचा विचार करून दर ठरवावेत जेणेकरून नागरिकांना याची सेवा देताना अडचणी येणार नाहीत 

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 

Share

Other News

ताज्या बातम्या