छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम गेटसमोर पडलेल्या भगदाडात लोकहित मंचने केले वृक्षारोपण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/04/2025 2:39 PM

 सांगली प्रतिनिधी 
                सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून, यात भरीस भर म्हणून सांगलीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमच्या गेट समोरच रस्त्यावर खोल असे भगदाड पडले आहे. सांगली शहरातील हे सहाव्या नंबरचे भगदाड असून, गेल्या महिनाभरापासून ते त्याच अवस्थेत आहे. सदर रस्ता मोठ्या प्रमाणात रहदारीचा असून छत्रपती शिवाजी स्टेडियमवर येणारे खेळाडू तसेच ज्येष्ठ नागरिक, जवळच असणारे केडब्ल्यूसी कॉलेज, दडगे हायस्कूल त्याशिवाय विद्यार्थ्यांचे बोर्डिंग जवळच असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांशी ये जा मोठ्या प्रमाणावर असते. हे भगदाड त्यांच्यासाठी धोकादायक करत आहे.
       गेल्या महिनाभरापासून ते त्यात अवस्थेत असूनही महानगरपालिका प्रशासनासह बांधकाम विभागाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सदर खड्ड्यांमध्ये एखाद्याचा प्राण गेल्यानंतर महापालिका प्रशासन बांधकाम विभाग जागे होणार का असा सवाल लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी उपस्थित करत आज सदर खड्ड्यात वृक्षारोपण केले.
     महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसह कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांची चौकशी करावी अन्यथा महानगरपालिका समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे 
    यावेळी गणेश थोरवे, अबबकर तहशिलदार, सुफियान  शेख, युवराज माळी, महेश साळवे,सम्मेद धांदले आदी स्थानिक नागरिक  उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या