इंदोर शहराला व तेथील प्रशासनाला व नागरिकांना जे जमतं ते आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन व नागरिकांना जमायला काय अवघड आहे...
मनपा प्रशासन व नागरिकांनी मिळून असा प्रयोग करायला काय हरकत नाही.
एकवेळ अशी होती की इंदोर हे शहर इतर शहराप्रमाणेच होते, सगळीकडे घाणीचे साम्राज्य होते, पण आज मात्र हे शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गणले जात आहे.
आमच्या नागरिक जागृती मंचच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत
एकटा राकेश दंडनावर, डॉल्फिन नेक्चर, सतीश दुधाळ,,मनापा स्वच्छता कर्मचारी इतर सामाजिक संस्था यांनी अभियान राबवून चालणार नाही तर समस्त नागरिकांनी याबाबत सहभाग घेतला तर शक्य आहे
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
Smkc Sangli