शहर अभियंत्याच्या बोगस सही प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई व्हावी : लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची निवेदनाद्वारे आयुक्तांकडे मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 07/04/2025 2:26 PM

माननीय प्रभारी आयुक्त,
 रविकांत अडसूळ साहेब,
 सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 
 
विषय- शहर अभियंत्यांच्या बोगस सही प्रकरणाची चौकशी होऊन, ठेकेदारास अभय देण्यात येऊ नये या संदर्भात                           
 
महोदय,
    बिल काढण्यासाठी एका ठेकेदाराकडून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांची बोगस सही बिलावर करून सदर बिल पास करण्यासाठी पाठवल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यापूर्वी महापालिकेमध्ये घडला होता .या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासनाकडून समितीची नेमणूक करण्यात आली होती. मात्र कित्येक दिवस उलटूनही या समितीकडून तसेच शहर अभियंत्यांकडून कोणताही अहवाल अद्याप सादर झालेला नाही.
      सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनातील काही अधिकारी आणि माजी नगरसेवक तसेच राजकीय पातळीवरून सुरू असल्याचे समजत आहे. 
      हे प्रकरण अत्यंत गंभीर असून महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी अशा भ्रष्ट कारभारास का पाठीशी घालत आहे असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी होऊन ठेकेदारासह त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कायदेशीर कारवाई होऊन योग्य ती कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आणि लोकहित मंचच्या वतीने करत आहोत.
      येत्या काही दिवसात संबंधितावर कायदेशीर कारवाई न झाल्यास महानगरपालिकेत समोर लोकहित मंचच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देत आहोत.
 
कळावे                    
 मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या