सांगलीतील प्रभाग क्रमांक 18 मधील एकता कॉलनीतील पाण्याच्या टंचाई बाबत लोकहित मंचच्या आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने आवाज उठवण्यात आला होता. या विरोधात इथल्या स्थानिक महिला नागरिकांनी महापालिकेचा निषेध व्यक्त करत आपल्या भावना नोंदवल्या होत्या.
सदर आंदोलनाची सांगली महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी तात्काळ दखल घेऊन, आज एकता कॉलनी मध्ये पाण्याचा टँकर पाठवून देत नागरिकांच्या मागणीला दाद दिली. मागणी केल्यानंतर प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी समस्या दूर करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलल्याने इथल्या स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, सांगली मिरज महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त रविकांत आडसूळ, सांगली महानगरपालिकेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे , विशेष पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील यांचे मानले आभार व्यक्त केले आहेत.