" सीताबाई संगई कन्या शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड."

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 16/09/2024 10:58 PM

अंजनगाव सुर्जी (जि.अमरावती) : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अभियानांतर्गत सीताबाई संगई कन्या शाळा अंजनगाव सूर्जी अमरावती जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: मुमंअ 2024/प्र. क्र 52/एसडी -6 दि. 26 जुलै 2024 अन्वये महाराष्ट्र कायवक्षेत्रातील शाळा, तालुका-358,जिल्हा-34,विभाग-8,राज्य असे विविध स्तर पाळण्यात आलेले आहे. या स्तरनुसार हीच शाळा तालुक्यात प्रथम होती. जिल्हास्तरावरील तपासणी करिता आलेल्या पथकाने सर्व निकषांचे मूल्यमापन केले. या मूल्यमापनात पायाभूत सुविधा नियमानुसार असणारे सर्व निकष पूर्ण केले व अमरावती जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड केली. या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री उत्तम मुरकुटे सर, पर्यवेक्षिका मा.सौ नीलिमा सांगोळे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मा.श्री अविनाशभाऊ संगई, उपाध्यक्ष मा.श्री उल्हासभाऊ संगई, सचिव मा.श्री विवेकभाऊ संगई, सहसचिव मा.श्री प्रसादभाऊ संगई, मा.श्री अजयभाऊ संगई, सदस्य मा.श्री.मुकुंदभाऊ संगई, मा.डॉ.श्री.अशोकभाऊ संगई, कार्यसदस्य मा.श्री.आशिषभाऊ संगई, .सदस्या मा.सौ.विजयाताई संगई ,मा.सौ मेधाताई संगई व सर्व व्यवस्थापक मंडळ यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केले. तसेच विभाग व राज्य स्तरावर यशस्वी होण्याकरता शुभेच्छा दिल्या.

सीताबाई संगई कन्या शाळा अंजनगाव सूर्जी अमरावती जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड.

Share

Other News

ताज्या बातम्या