*मिरज जंक्शन मधुन धावणार राजधानी*
दक्षिण - पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातुन लवकरच बेंगलुरु नई दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुरु करण्यात येत आहे.
दावणगेरी,अर्सिकेरी,हुबळी, धारवाड,बेळगाव,मिरज,पंढरपुर,कुर्डुवाडी, मनमाड,भोपाळ,झाँशी,आग्रा या मार्गे राजधानी धावणार आहे.
सध्या आय टी क्षेत्रात बेंगलुरु हे महत्त्वाच्या स्थानात आहे सध्या देशात होत असलेल्या हरियाणा राज्यातील गुडगाव या ठिकाणी आय टी क्षेत्रातील फायस्टार हब निर्माण होत असल्यामुळे बेंगलुरु ते दिल्ली या दरम्यान प्रवाशांची गाडीची मागणी लक्षात घेता मध्यंतरी या दरम्यान विशेष गाड्या चालवल्या होत्या त्याला मिळालेल्या प्रतिसाद पाहुन दक्षिण - पश्चिम रेल्वेकडुन या मार्गावर जलद अशी राजधानी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असुन अक्टोबरच्या पहिल्या अठवड्यात गाडी सुरु होणार आहे.