मुख्यमंत्री सौर उर्जा प्रकल्पाला दिलेल्या जमिनीबाबत जिल्हाधिकारी यांना फेरविचार करावा,: भगवानदास केंगार,जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा संघ

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/09/2024 4:47 PM

 शेड्याळ तालुका जत शेड्याळ ग्रामपंचायत हद्दीत गायरान मधील 50 एकर जमिनीवर उभारत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या प्रकल्पाला दिलेल्या जमिनी बाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी फेरविचार करावा..असे निवेदन सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे..
शेड्याळ ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 73 -76 मधील 50 एकर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ला दिल्यामुळे येथील शेतकरी व नागरिक यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार 26/6/ 2023 मध्ये ग्रामसभा व मासिक मीटिंगमध्ये ठराव घेऊन 10 एकर जमीन कृषी वाहिनीला देण्याचे एकमताने ठराव झालेला होता. पण जिल्हाअधिकारी यांनी आता वीज प्रकल्प कंपनीला 50 एकर जमीन दिल्याची माहिती दिल्यामुळे गावातील शेतकरी व पशुपालक यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झालेली आहे. गावात 3000 च्या वर मेंढ्या-शेळ्या -गाई म्हशी व इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एवढी जमीन वीज प्रकल्पासाठी अडकून पडल्यास जनावरांचा चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. एकीकडे जत तालुका दुष्काळाने होरपळत असतो दुसरीकडे प्रशासनाने ही मनमानीपणे ही जमीन अशी संपादन करून घेत असेल तर शेतकरी व पशुपालक कोणाकडे न्याय मागणार..?
या संदर्भात गावातील 300 पशुपालक व शेतकरी यांनी 22/7/24 रोजी सह्यांची मोहीम राबवून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे फेर विचार करण्यासंदर्भात विनंती अर्ज पाठवलेला होता परंतु त्याला कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.जत तालुक्यात अशा अनेक गावात अशा अडचणी निर्माण झालेली आहे. म्हणून जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की आपण संपादन केलेली 50 एकर जमीनी बाबत फेरविचार करून त्यातील 10 एकर जमीन वीज प्रकल्पाला द्यावेत उरलेले जमीन आपल्याच ताब्यात ठेवावेत. याला गावातील शेतकरी व नागरिकांचा पाठिंबा आहे. गावातील पशुपालक व शेतकरी यांचा गांभीर्याने विचार करून माननीय जिल्हाधिकारी यांनी फेरविचार करावा अशी मागणी शिवसेना युवा नेते सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एक निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे ही मागणी केलेली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या