परतवाडा जि.अमरावती : शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालय जिल्हा परिषद अमरावती जा. क्र.6298 /2024 दि. 31/07/2024 च्या पत्रानुसार स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिर दि.21 ते 27 ऑगस्ट 2024 पर्यंत भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला आदिवासी क्षेत्रातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा उपातखेडाचे मा. मुख्याध्यापक तथा विषय शिक्षक श्री नितीन रसे सर यांनी स्काऊट गाईडचे बेसिक प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणाचा उद्देश शासनाने विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये शिस्त व आपले कर्तव्य शालेय वयात आत्मसात व्हावे या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेत स्काऊट गाईडचे शिक्षण देणे अनिवार्य केले आहे. प्रथमच आदिवासी क्षेत्रात मा.शिक्षकाने आपल्या शाळेत स्काऊटच्या विद्यार्थ्यांचे पथक तयार केले आहे व प्रशिक्षण देणेसुरू केले आहे त्यानिमित्त शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन प्रशिक्षण शिबिर