सांभारे गणपती श्रीं च्या मिरवणुकीत आमदार, खासदास व इतर गणमान्य नेत्यांचा सहभाग

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/09/2024 12:55 PM

१२५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या तसेच १४' फूट उंच ९' फूट रुंद आणि तब्बल १.५ टन वजन असलेल्या भारतातील एकमेव पांगेरीच्या लाकडापासून बनवलेल्या  सांगलीतील गाव भागातील प्रसिद्ध सांभारे गणेश मंदिरातील ‘श्रीं’ ची भव्य  मिरवणुकीस उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. प्रत्येकवेळी माझ्यासोबत खंबीर पणे उभ्या असलेल्या समस्त सांगलीकरांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना यावेळी केली. 
सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे राजवैद्य आबासाहेब सांभारे यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून १८९९ साली सांगली येथे गावभागातील सांबरे वाड्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. 
या वाड्यातच भव्य असे श्री गणेश मंदिर बांधले.आणि या भव्य व सुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. लता मंगेशकर ,दीनानाथ मंगेशकर,अब्दुल करीम खाँ यांनी देखील आपल्या कलेची सेवा या गणरायसमोर सादर केली आहे. 
मूर्ती तयार करायला घेतल्यानंतर ही मूर्ती गणेशचतुर्थीला पूर्ण झाली नाही. या कारणाने हा बाप्पा गणेश चतुर्थीला न बसता अष्टमीच्या तिथीला बसतो. 

१९२८-१९५२ पर्यंत सुरू असलेली मिरवणूक जागेच्या अभावी ,विजेचे खांब आणि इतर काही कारणाने बंद झाली होती. ही मिरवणूक ७२ वर्षांनंतर यंदाच्या साली अनंत चतुर्थीच्या शुभ दिनी पारंपरिक वादयांच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आली. 
या सोहळ्यास उपस्थित राहून सांगलीकर असल्याचा अभिमान वाटला आणि मन प्रफुल्लित झाले.
यावेळी  खासदार. विशाल पाटील, युवराज आदित्यराजे पटवर्धन, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पै.पृथ्वीराज पवार, समस्त सांभारे परिवार यांच्यासह  दूरवरून हा सोहळा पाहण्यासाठी आलेले अनेक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या