आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालय आवारातच मोकाट कुत्री वस्तीला : लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/09/2024 4:42 PM

सांगली प्रतिनिधी 
                  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून ,प्रत्येक गल्लीबोळांमध्ये मोकाट कुत्री पाहायला मिळत आहेत .अशा मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी अनेक वेळा लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली असतानाही त्याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .
    अशा मोकाट कुत्र्यांकडून अनेक वेळा महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसह लहानग्या बालकांवर हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत .गेल्या आठवड्यामध्येच संजय नगर परिसरातील एका चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केल्याचा प्रकार समोर आला असतानाही महानगरपालिका प्रशासनाला जाग येताना दिसत नाही .महापालिका क्षेत्रातील रस्त्या रस्त्यांवर ही मोकाट कुत्री बिनधास्तपणे वावरताना दिसतातच मात्र आता या कुत्र्यांनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखालीच वस्ती केल्याचे दिसून येत आहे .आपल्या कार्यालयाच्या आवारातील कुत्र्यांचा बंदोबस्त करायला महापालिका प्रशासनास वेळ नाही तर हे प्रशासन महापालिका क्षेत्रातील कुत्र्यांचा बंदोबस्त कसा काय करणार ?असा प्रश्न उपस्थित होतोय .लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा लोकहित मंचच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे .

Share

Other News

ताज्या बातम्या