जुना बुधगाव रोड रेल्वे क्रॉसिंग येथील चार चाकी गाडी जावू नये म्हणून लावण्यात आलेले गर्डर काडून टाकण्यात आले असून परत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे
आधीच उल्लास त्यात फाल्गुन मास....
काल आम्ही सोबत सचिन जगदाळे प्रवीण कुलकर्णी चिंतामण नगर रेल्वे पूलाच्या कामाची पाहणी केली
आणि सदर कामाची परिस्थिती पाहून रेल्वेचे शाखा अभियंता श्री शिंदे साहेब यांच्याशी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला
माधव नगर एका बाजूकडील भराव पूर्ण झालेला आहे मात्र मुख्य स्लॅब च्या ठिकाणची स्वच्छता व अन्य कामे बाकी आहेत
सांगली कडची बाजू 50% भराव पूर्ण झालेला आहे मात्र अजूनही 50% भराव बाकी आहे बरीचशी एका बाजूकडील कामे अपूर्ण आहेत 10 सप्टेंबरला एकेरी वाहतूक चालू करणार असे रेल्वेने सांगितले होते परत ती 15 सप्टेंबर झाली परत ती 30 सप्टेंबर झाली काल पाहणी केलेल्या नुसार 30 सप्टेंबर पर्यंत सुद्धा एकेरी वाहतूक चालू होईल का नाही याबाबत शंका आहे
30 ऑगस्ट 2024 पर्यंत सदर कामाचे मुदत होती तसेच तोपर्यंत जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढून सदर रस्ता बंद करण्याचे जाहीर केले होते
मात्र 1 सप्टेंबर 2024 पासून मा जिल्हाधिकारी साहेब यांनी रस्ता बंद करण्यासाठी वाढीव अधिसूचना काढलेली जाहीर करण्यात आली नाही..? मा जिल्हाधिकारी साहेब यांनी अधिसूचना वाढीव मुदतीची काढली आहे किंवा नाही हे कळत नाही आणि कोणी सांगतही नाही
मग सदर रस्ता बेकायदेशीर त्या बंद केलेला आहे का. ? बेकायदेशीर रित्या बंद केला असल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासन कोणती कायदेशीर कारवाई करणार आहे..? का मा जिल्हाधिकारी साहेब यांनी वाढीव मुदत दिलेली आहे का..?
असे बरेचसे प्रश्न याबाबत निर्माण होत आहेत 27 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये माननीय खासदार विशाल दादा पाटील यांनी बैठक आयोजित केलेली होती. मात्र महापूर सदृश्य परिस्थितीमुळे सदर बैठक रद्द झाली परत त्या बैठकीसाठी कोणी सुद्धा प्रयत्न केलेले नाहीत
माजी आमदार नितीन राजे शिंदे असतील पृथ्वीराज भैय्या पवार असतील किंवा सर्वपक्षी कृती समिती म्हणून व नागरिक जागृती मंच आम्ही याबाबत वारंवार जागेवर जाऊन पाहणी असेल वेगवेगळ्या आंदोलन असेल होत आहेत मात्र एकही लोकप्रतिनिधी पालकमंत्री याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये बैठक घेऊन रेल्वे प्रशासन यांना जाब विचारताना दिसत नाही
मग याला जबाबदार कोण लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्री म्हणून हे जबाबदार पार पाडणार आहेत का नाहीत
आम्ही तर आज बेकायदेशीर त्या रस्ता बंद केलेला आहे म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे तक्रार करत आहोत
पालकमंत्री मा नाम सुरेश भाऊ खाडे यांच्या निवासस्थानासमोर व
रेल्वेचे अधिकारी श्री पाखरे साहेब यांच्या मुंबई निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा आज आम्ही या माध्यमातून देत आहोत
आता ह्या कामाबाबत कोणाकडूनही अपेक्षा राहिलेल्या नाहीत या सर्व व्यवस्थेचा जाहीर निषेध
सतीश साखळकर उमेश देशमुख शंभू राज काटकर गजानन साळुंखे संतोष पाटील अजित सूर्यवंशी नितीन चव्हाण असिफ बावा युसुफ उर्फ लालू मिस्त्री कयुम पटवेगार महालिंग हेगडे प्रकाश निकम सचिन देसाई जयदीप चेंडके डॉ ज्ञानेश्वर शिंदे उदय पाटील दिनकर साळूंखे दत्ता शिंदे सागर शिंदे कांतीलाल कोठारी सुरेश मालणी सुरेश नुली अमर पाटील
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा