*सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने प्रधानमंत्री मोदीजी यांना केलेल्या तक्रारीमुळे 21 सप्टेंबरच्या पहाटे सांगली रेल्वे स्टेशनवर हुबळी-निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा थांबा सांगली रेल्वे स्टेशनला मिळाला*
*सांगली जिल्ह्यातून दिल्ली मथुरा आग्रा झांसी भोपाळ अयोध्या जाणाऱ्या प्रवाशांची सोय*
अध्यक्ष,सतीश साखळकर
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच
सांगली जिल्ह्यातील लोकांसाठी सांगली रेल्वे स्टेशन वरून दिल्ली जाणारी गोवा एक्सप्रेस ही एकमेव दैनंदिन गाडी आहे.
त्या व्यतिरिक्त आठवड्यातून एकदा धावणारी कोल्हापूर-निजामुद्दीन, मैसूर-निजामुद्दीन आणि दर्शन एक्सप्रेस अशा तीनच साप्ताहिक गाड्या आहेत.
त्यामुळे सांगली जिल्ह्यातून दिल्ली जाणाऱ्या लोकांना कधीही रेल्वेचे तिकीट मिळत नाही व त्यांना पुणे किंवा मुंबईला जाऊनच दिल्ली जाणारी रेल्वे पकडवावी लागते ज्याच्यामुळे खूप गैरसोय होते.
नुकतेच रेल्वेने हुबळी-निजामुद्दीन (दिल्ली) साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. या गाडीची सध्या एक फेरी सोडण्यात येणार असून या फेरीला प्रतिसाद मिळाल्यास ही गाडी नियमित धावेल.
पण नेमक्या याच दिल्ली जाणाऱ्या गाडीला मध्य रेल्वेने सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा दिला नाही. सांगली रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील प्रचंड मोठे उत्पन्न देणारे स्टेशन असताना देखील सूडबुद्धीने मध्य रेल्वे सांगली रेल्वे स्टेशनच्या या गाडीचा थांबा नाकारला.
त्या विरुद्ध नागरिक जागृती मंचने पंतप्रधान मोदीजी यांच्याकडे तक्रार करून दाद मागितली. या तक्रारीवर लगेच कारवाई करत पंतप्रधान मोदीजींच्या कार्यालयाने मध्य रेल्वेला हुबळी-निजामुद्दीन साप्ताहिक विशेष गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर केला आहे.
ही गाडी शुक्रवार रात्री 12 नंतर म्हणजेच शनिवार पहाटे 3:32 वा सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटेल.
सांगलीतून सुटल्यानंतर ही गाडी पुणे कोपरगाव मनमाड भुसावळ खंडवा इटारसी भोपाल बिना झांसी आग्रा मथुरा मार्गे निजामुद्दीन-दिल्लीला दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळ 11:40 वाजता पोचेल.
हुबळी-सांगली-निजामुद्दीन मार्गावरील या गाडीमध्ये सांगली रेल्वे स्टेशनसाठी 950 तिकीटे उपलब्ध आहेत.
तरी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सांगली रेल्वे स्टेशन ते दिल्ली आग्रा मथुरा भोपाळ झांसी इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी सांगली रेल्वे स्टेशन वरून तिकिटे काढावी किंवा ऑनलाइन तिकिटे काढावीत.
*सांगली जिल्ह्यातून 21 सप्टेंबर पहाटेच्या हुबळी-निजामुदीन एक्सप्रेसने सांगली स्टेशनवरून अयोध्या जाणाऱ्या भाविकांची सोय होणार*
हुबळी-निजामुद्दीन गाडी झांसी रेल्वे स्टेशनवर थांबत असून झाशी येथे उतरून पुढे रस्ते किंवा रेल्वे मार्गांनी आयुध्येला जाता येते त्यामुळे अयोध्या जाणाऱ्या लोकांनी भरपूर संख्येने ता 21 सप्टेंबरचे सांगली ते झाशी तिकीट काढावे व झाशीत उतरून अयोध्या पोहोचावे.
*हुबळी-निजामुदीन एक्सप्रेस व अन्य गाड्यांचे बोर्डिंग स्टेशन सांगली करून घ्यावे*
ज्या लोकांनी मागच्या आठवड्यात हुबळी, बेळगाव किंवा मिरज येथून हुबळी-निजानुदीन गाडी क्र 07325 ची तिकिटे काढली आहेत त्यांनी आपले बोर्डिंग स्टेशन सांगली करून घ्यावे म्हणजे सांगली स्टेशनवरून गाडी पकडता येईल.
*सांगली रेल्वे स्टेशनवर सर्व गाड्या पुरेसा वेळ थांबतात*
सांगली रेल्वे स्टेशन वरून ही गाडी पकडावी. प्रवासी मित्र लक्षात घ्या सांगली रेल्वे स्टेशन वरून भरपूर प्रवासी रेल्वे गाडी चढत असल्यामुळे सर्व रेल्वे गाड्या सांगली रेल्वे स्टेशनवर पुरेसा वेळ थांबवल्या जातात त्यामुळे घाबरण्याचे अजिबात कारण नाही. बिनधास्त सांगली रेल्वे स्टेशन वरून गाड्या पकडा.
आपला दिल्ली मथुरा आग्रा चा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा हीच सांगली जिल्हा नागरिक जागृती म्हणजे तर्फे सदिच्छा