स्वच्छता ही सेवा अभियानात नागरिकांचा सहभाग आवश्यक : गिरीश महाजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 17/09/2024 1:59 PM

नांदेड : शहरातील मोठया प्रमाणावर गलिच्छ व अस्वच्छ ठिकाणे साफ करण्यासाठी स्वच्छता मोहिम राबविणे. या मोहिमेस नागरिकांचे समर्थन व सहभाग, स्वच्छता कामगारांच्या योगदानाची ओळख,देशातील स्वच्छता आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या भविष्यासाठी वचनबध्दतेची पुष्टी करणे हे या अभियानाचे उदिष्ट आहे. या स्वच्छता ही सेवा अभियानात सर्वाचा सहभाग आवश्यक असल्याचे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन  यांनी केले. त्यांच्या हस्ते आज स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते. 

आज माता गुजरीजी विसावा उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 76 वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार भिमराव केराम, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, दिलीप कंदकुर्ते,  संतुकराव हंबर्डे आदींची उपस्थिती होती. 

     राष्ट्रपिता महात्मा गांधीजीना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अपर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांची पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी सन 2017 पासून वार्षिक स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. दिनांक 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी स्वभाव स्वच्छता -संस्कार स्वच्छता हे अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात नागरिकांनी उर्त्स्फूतपणे सहभाग घ्यावा, असेही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Share

Other News

ताज्या बातम्या