कोल्हापूर पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे सांगली येथे ढोल ताशे वाजवत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व सांगलीकर व प्रवासांकडून "धन्यवाद मोदीजी "असा नारा देत,केंद्र सरकारचे आभार मानले. यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, सांगली विधानसभेचे आमदार सुधीर दादा गाडगीळ, सांगलीचे आयुक्त शुभमजी गुप्ता, विधानसभा समन्वयक शेखरजी इनामदार, भाजपा अध्यक्ष प्रकाश मामा ढंग,MSEB संचालिका सौ.नीताताई केळकर, महिला प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे,महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजलीताई ढोपे पाटील, युवा नेते प्रभाकरभैया पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सांगलीकर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.