नांदेड : नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड सदस्य नोंदणी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली. त्यातील पात्र उमेदवारांच्या तांत्रिक अर्हता, मैदानी चाचणीत घेतलेल्या गुणांची उमेदवारांची यादी होमगार्ड संघटनेच्या http://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी 19 सप्टेंबर 2024 पर्यत सकाळी 10 ते 17 या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, आनंद नगर रोड, हर्ष नगर येथे स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या
[email protected] या मेलवर आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर आलेल्या हरकती/आक्षेप यांची नोंद घेतली जाणार नाही असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी केले आहे.
जाहीर केलेल्या यादीतील उमेदवांराच्या नावासमोर तांत्रिक गुण, मैदानी चाचणी गुण दर्शविण्यात आलेले आहेत. गुणांबाबत उमेदवारांना काही हरकती, आक्षेप असल्यास कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात स्वत: चे नाव नोंदणी अर्ज क्रमांक, चेस्ट क्रमांक व मोबाईल क्रमांकासह 19 सप्टेंबर 2024 पर्यत कार्यालयीन वेळेत कार्यालयास उपस्थित राहून किंवा दिलेल्या मेल आयडीवर आक्षेप नोंदवावेत असेही जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.