शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे मागणीसाठी २५ सप्टेंबर रोजी सरकारचा महाळ घालुन ४ ऑक्टोबर रोजी ना. नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार.....
शक्तिपीठ महामार्गाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उलट सुलट विधाने करुन बाधित शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. म्हणुन महाराष्ट्र सरकारचा दि. २५ सप्टेंबर रोजी महाळ घालण्याचा निर्णय आज बाधित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर महाराष्ट्र सरकार मधील मंत्री एका बाजूस महामार्ग रद्द झाला आहे. असे सांगतात तर दुसऱ्या बाजूस मा. मुख्यमंत्री फक्त नांदेड, कोल्हापूरचा विरोध आहे, असे विधान करतात, म्हणून केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णयही आज घेण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने करुन शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे. राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. असे असताना मुख्यमंत्र्यांना विरोध सांगली जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. म्हणून ना. गडकरींना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला.
उमेश देशमुख.सतिश साखळकर .प्रभाकर तोडकर.सुनिल पवार.उमेश एडके.पैलवान विष्णू पाटिल.अभिजीत जगताप.प्रविण पाटिल.श्रीकांत पाटिल.यशवंत हरुगडे. सुधाकर पाटिल.विलास थोरात.राजेश पाटिल.विलास पाटिल.धनाजी पाटिल