अमरावती : अमरावती येथे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी संसदेचे विरोधी पक्ष नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या वर आक्षेपहार्य टीका केली असून आज अमरावती शहर पोलिस आयुक्तालय येथे मा. नवीनचंद्र रेड्डी ( पोलीस आयुक्त अमरावती ) यांना निवेदन देऊन खा.अनिल बोंडे यांच्या वर गुन्हा नोंदविण्यात येत नाही तोवर आयुक्तालयात ठिय्या दिला तसेच या संदर्भातले निवेदन नवीन चंद्ररेड्डी यांना दिले. आणि पुढे सुद्धा अमरावती जिल्ह्याचे वातावरण दूषित करणाऱ्यांवर क ठोर कारवाई करण्यात यावी असे या प्रसंगी पोलिस आयुक्तांना ठामपणे सांगितले. यावेळी प्रामुख्याने - आमदार यशोमतीताई ठाकूर, खासदार बळवंतभाऊ वानखडे अमरावती लोकसभा, मा. बबलूभाऊ देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण, मा.सुनीलभाऊ देशमुख , मा. वीरेंद्रभाऊ जगताप, मा. बबलूभाऊ शेखावत, मा.हरिभाऊ मोहोड , भैया पवार, विलासभाऊ इंगोले, मिलिंदभाऊ चिमोटे, निलेश घुहे, वैभव देशमुख , अनिकेत डेंघळे यांच्यासह काँग्रेस कमिटी चे सर्व पदाधिकारी यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
" राहुलजी गांधी यांच्या वर आक्षेपहार्य टीका "