कोल्हापूर रोडची चाळण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, सुधारणा न केल्यास लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांचा आंदोलनाचा इशारा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/09/2024 5:25 PM

चांगली प्रतिनिधी 
                  सांगली मधील कोल्हापूर रोडवर शेकडो खड्डे पडले असून ,यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळन झालेली दिसून येत आहे.सदर रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांना धोकादायक झाले असून ,रहदारीचा हा मार्ग जीवघेणा बनला आहे .सदर रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून ,सदर ठेकेदाराने देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.ठेकेदारांनी रस्ता बनवल्यानंतरही पुढील काही वर्षे सदर रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे बंधनकारक असतानाही तशी देखभाल दुरुस्ती होताना दिसत नाही.सदर ठेकेदारांच्या या अरे रावीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दाम डोळे झाक केली जात असल्याचा आरोप लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केला आहे .
       सांगलीचे आमदार खासदार याच रस्त्यावरून ये जा करत असतानाही त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष होत आहे .लवकरात लवकर सदर रस्त्याकडे लक्ष देऊन सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा लोकहीत मंचच्या वतीने हे खड्डे स्वखर्चाने मुजवू असा इशारा  अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे .

Share

Other News

ताज्या बातम्या