सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत जी. एस टी. परतावा वेळेत मिळत नसलेबाबत कृष्णा व्हॅली चेंबरचे अर्थ तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/09/2024 2:25 PM

कुपवाड : प्रतिनिधी

औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे सामुहिक प्रोत्साहन योजना (पी.एस.आय. – २०१९) अंतर्गत जी.एस.टी. परतावा वेळेत मिळत नसलेबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू संचालक हरिभाऊ गुरव यांनी दिली.

सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत मशिनरी खरेदी, इमारत उभारणी (नवीन/ वाढीव) या बँकांची कर्जे उचलून केलेल्या आहेत. सदरची गुंतवणूक करण्यापाठीमागे शासनाकडून भरीव जी.एस.टी. परतावा मिळेल या आशेवर केलेली आहे. परंतु ऑक्टोबर-२०२३ पासून परतावा शासनाकडून मिळालेला नाही. 

उद्योजकांना बँकेचे हप्ते हे रेग्युलर भरावे लागतात. जी.एस.टी. चे पैसे प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला द्यावे लागतात. सामुहिक प्रोत्साहन योजना (पी.एस.आय. – २०१९) अंतर्गत जी.एस.टी. परतावा परत मिळत नसलेने उद्योजक मोठ्या आर्थिक अडचणीत येत आहेत. उद्योजकांना सामुहिक प्रोत्साहन योजनेवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली हे चुकीचे गणित शाबित होते की काय अशी शंका निर्माण होत आहे. तरी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना विनंती आहे की, वरील प्रलंबित असणारी उद्योजकांची देयके लवकरात लवकर वितरित करावीत असे निवेदनात म्हंटले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या