कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनचे सांगली रेल्वे स्टेशनवर उत्साहात स्वागत

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/09/2024 7:19 PM

आज कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेनचे सांगली रेल्वे स्टेशनवर उत्साहात स्वागत केले फटाक्यांच्या माळा व शोभेचे दारू काम करून स्वागत झाले.
आपल्या सांगलीसाठी पुणे व कोल्हापूर पुणे अशा दोन वंदे भारत गाड्या चालू केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी रेल्वेमंत्री अश्विनी जी वैष्णव तसेच आपले नवनियुक्त खासदार विशाल दादा पाटील यांचे आभार व्यक्त करून 
आपल्या सांगलीच्या उज्वल भवितव्यासाठी व रेल्वेच्या उत्पन्नाच्या व सर्व लोकांच्या सोयीसाठी कोल्हापूर मुंबई वंदे भारत पुणे गोवा वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात याव्यात 
तसेच चंदिगड यशवंत पूर संपर्क क्रांती गाडीचा थांबा सांगलीला मिळावा तसेच आपल्या कवलापूर विमानतळाचा विषय सांगली मिरजेत एम्स हॉस्पिटल सांगलीचे स्मार्ट सिटी अशा आशयाचे बोर्ड हातात धरण्यात आले होते 
यावेळी सतीश साखळकर कॉम्रेड उमेश देशमुख युवक काँग्रेसचे विजय पवार शिवाजी मोहिते नितीन चव्हाण उदय पाटील राहुल पाटील गजानन साळुंखे राजू निंबाळकर इत्यादी सांगलीकर उपस्थित होते.
आज रेल्वेने आमच्या नागरिक जागृती मंचाच्या सर्वांसाठी पुण्यापर्यंतचे पास उपलब्ध करून दिले होते आम्ही आज सांगली ते कराड पर्यंत वंदे भारत मधून प्रवास केला.
सदर प्रवासामध्ये खासदार विशाल दादा पाटील यांच्या सुविद्या पत्नी सौ पूजा विशाल पाटील भारतीय जनता पार्टीचे नेते शेखर इनामदार व इतर बरेचसे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय उपस्थित होते

तसेच सदर ट्रेनचे ड्रायव्हर व रेल्वेचे अधिकारी यांना आपल्या सांगलीच्या परंपरेप्रमाणे हळद बेदाणे व भडंग भेट देण्यात आला.

Share

Other News

ताज्या बातम्या