अनंत चतुर्दशी निमित्त दत्ता पाटील कोकाटे यांच्यावतीने उद्या महाप्रसादाचे आयोजन : खा. नागेश पाटील आष्टीकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,आयुक्त डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/09/2024 4:47 PM

नांदेड : अनंत चतुर्दशी निमित्त शिवसेना सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी आसन टी पॉइंट सांगवी बु. येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी नऊ वाजता नाही खा. नागेश पाटील आष्टीकर,  जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार  ,आयुक्त महेश डोईफोडे यांच्या हस्ते या महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे . भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे. 
अनंत चतुर्दशी निमित्त गेल्या वीस वर्षापासून सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने सांगवी बू. आसना टी पॉईंट येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. अकरा क्विंटल तांदळाचा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सातत्याने दरवर्षी आयोजित केला जातो . हजारो भावीभक्त दरवर्षी महाप्रसादाचा लाभ घेत असतात.याही वर्षी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  यावर्षी आयोजित करण्यात आलेला महाप्रसादाचा सोहळा उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन खा.  नागेश पाटील आष्टीकर,  जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,  महापालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी शिवसेनेचे नेते धोंडू पाटील, भुजंग पाटील , जिल्हाप्रमुख बबन बारसे,  जिल्हाप्रमुख बंडू खेडकर आदींची उपस्थिती राहणार आहे. आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसाद वाटपाच्या सोहळ्यास शिवसेनेच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी, शिवसैनिकांनी आणि भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तथा सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या