*अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्यांना निर्भयाचा झटका सिद्धेश्वर कुरोली येथील दोन जणांना अटक

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 16/09/2024 11:36 AM

 *


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)



वडूज दि:खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील अल्पवयीन मुलींची छेड काढणाऱ्या दोन जणांना निर्भया पथकाने अटक केल्याची माहिती वडूज पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकातील सविस्तर माहितीनुसार सुमित पृथ्वीराज देशमुख, साईराज किरण बागल दोघे रा. सिद्धेश्वर कुरोली, हे दोन तरुण दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची छेडछाड करत असल्याची गोपनीय माहिती वडुज पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून त्यांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानुसार निर्भया पथकाला रवाना केले गेले. निर्भया पथक त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सदर अल्पवयीन मुलींचे समुपदेशन करून दोन तरुणांना बॉक्स अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाघमारे, पोलीस नाईक सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव, सागर पोळ राजश्री खाडे, सुमाली घाडगे, वडूज पोलीस स्टेशनचे मल्हारी हांगे, तुषार हांगे यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक, श्री. वाघ व कांबळे करत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या