दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १४ जणांना केले तडीपार.....

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 16/09/2024 11:35 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

प्रांताधिकारी  गाडेकर यांनी दिले कारवाईचे आदेश

दहिवडी दि:सर्वत्र गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण साजरा होत असल्याने सणाच्या कालावधीत दहिवडी पोलीस ठाणे च्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन न देता गणेशोत्सव शांततेत पार पाडावेत या दृष्टीने दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील वेळोवेळी गुन्हे करून सामाजिक स्वस्त बिघडवणारे दंगा, गोंधळ करणारे १४ गुन्हेगार तडीपार करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दहिवडी हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता. त्या अनुषंगाने ही कारवाई प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. 
  स्वप्निल युवराज पाटोळे रा. राजवडी, अजय उर्फ सोन्या राम गुजले रा. गोंदवले बुद्रुक, शरद नारायण पांढरे रा. वावरहिरे, बाबुराव अण्णा पवार , रा. मलवडी, अंकुश किसन चव्हाण रा. मलवडी, योगेश राजाराम माने पिंगळे बु., शेखर युवराज अवघडे गोंदवले बु., काळाराम यशवंत मदने रा. शिंगणापूर, शिवाजी कोंडीबा बोडरे रा. सुकासन जिवन शिवाजी जाधव रा. नरवणे, प्रदीप प्रकाश धर्माधिकारी रा. वावरहिरे, लहूराज किसन चव्हाण रा. मलवडी, दीपक नामदेव मसुगडे रा. नवलेवाडी, सचिन हनुमंत माने गोंदवले बु. सर्व ता.माण जि. सातारा येथील असून यांना नमूद कालावधीत दहिवडी पोलीस स्टेशन क्षेत्रात प्रवेश करण्यास आणि निवास करण्यास मनाईचे आदेश निर्गमित केले असून नमूद इसमांना माण तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. 

    पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, यांच्या आदेशानुसार हे कारवाई करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तडीपार करून दणका दिला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या