मातंग समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने नूतन विश्रामबाग पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांचा सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/09/2024 11:26 AM


विश्रामबाग पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक मा. कांबळे साहेब यांचा आमचे आपले भविष्य भारतीय संविधान हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. 
सुरुवातीस दलित मित्र मा.अशोक पवार सर यांनी सर्वांची ओळख करून दिली. 
बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते प्रा. राम कांबळे सर प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे असं सांगितलं. 
आम्ही सत्याच्या बाजूने असतो आणि ज्या ठिकाणी प्रशासनाला मदत करायचे आहे त्या ठिकाणी मदत करतो.
पण ज्या ठिकाणी बहुजन समाजावर अन्याय होतो‌ त्या ठिकाणी आम्ही मात्र प्रशासनाच्या विरोधात जाऊन पीडीतास न्याय मिळवून देतो. 
फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीतील अभ्यासू युवा नेते मा. आकाश तिवडे मेजर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा येतो.
त्या ठिकाणी होणारे कार्यक्रम आणि पूर्वी ज्या ज्या घटना त्या ठिकाणी झाल्या होत्या त्या सर्वांचा आढावा त्यांनी त्या ठिकाणी मांडला. 
सदर सत्काराच्या अनुषंगाने कांबळे साहेब यांनी सुद्धा समाजातील चांगल्या प्रबोधनाच्या कार्यक्रमास आमचे सहकार्य राहील असे त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिले.
सामाजिक कार्यकर्ते मा. दादासाहेब कस्तुरे यांनी नुकतंच त्यांचा संविधानावरती नवीन काढा आलेला आहे यासंदर्भात त्यांनी कांबळे साहेबांना माहिती दिली व त्यामुळे साहेबांनी ही याबद्दल त्यांचे कौतुक केले. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर मागासवर्गीय न्याय विभागाचे अध्यक्ष मा. कुमार वायदंडे मामा, सामाजिक कार्यकर्ते मा. झाकीर नदाफ, मा. अमर मगदूम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या