सांभारे गणपतीचे यंदाचे १२५ वे वर्ष, अनंत चतुर्थीला निघणार भव्य अशी मिरवणुक...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/09/2024 9:08 PM

सांगलीच्या पटवर्धन संस्थांचे राजवैद्य आबासाहेब सांभारे यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून १८९९ साली , सांगली मध्ये त्यांच्या गावभागातील वाड्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. वाड्यामध्येच त्यांनी गणपतीचे मंदिर बांधले आणि १४ फूट उंच आणि ९ फूट रुंद अशी पांगेरीच्या लाकडापासून एक भव्य आणि सुंदर गणपतीची मूर्ती बनवली. जिचे वजन जवळपास दीड टन आहे. १९५२ सालापर्यंत या गणपतीची भव्य मिरवणूक निघायची. परंतु पुढे लहान रस्ते, वाटेत येणाऱ्या विविध अडथळ्यामुळे ती मिरवणूक बंद झाली. परंतु यंदा या गणेशोत्सवाचे १२५ वे वर्षे असल्यामुळे येत्या अनंत चतुर्दशीला  गणपतीची भव्य मिरवणूक निघणार आहे. यासाठी सांभारे कुटुंबीय आणि गावभागातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी समस्त सांगलीकरांना या मिरवणुकीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण भारत देशामध्ये दशमीला स्थापन होणारा आणि अनंत चतुर्दशीला विसर्जित होणारा हा एकमेव गणपती सांगलीकरांच्या श्रद्धेचा आणि सांगलीच्या मानाचा विषय आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या