"सीताबाई संगई कन्या शाळा अंजनगाव सूर्जी तालुक्यातून प्रथम "

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 15/09/2024 8:15 PM

अंजनगाव सुर्जी (जि.अमरावती) : "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अभियानांतर्गत सीताबाई संगई कन्या शाळा अंजनगाव सूर्जी तालुक्यातून प्रथम. 
110 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या  सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या  या शाळेच्या गुणांक तपासणी पथकाने दोन्ही टप्प्यांमध्ये सर्व निकषांवर झालेल्या मूल्यमापनानुसार प्रथम क्रमांक घोषित केला. या तपासणी अंतर्गत पायाभूत सुविधा,वर्ग खोल्या, ग्रंथालय, प्रशासकीय कार्यालय, आरोग्य सेवा, प्रयोगशाळा, अटल लॅब, स्वच्छता, क्रीडांगण, परसबाग, शैक्षणिक साधनसामग्री तसेच MTS, NMMS, स्कॉलरशिप, होमी भाभा, बाल वैज्ञानिक, नोबेल सायन्स टॅलेंट सर्च, इन्स्पायर अवार्ड, गणित प्रज्ञा संबोध, नवोदय, चित्रकला, ओलंपियाड,  शिष्यवृत्ती तसेच असंख्य विद्यार्थिनी 90% च्या वर ते 100% पर्यंत दहावी बोर्ड परीक्षेत यश प्राप्त केले. अशा अनेक महत्त्वाच्या परीक्षांमध्ये राज्यस्तरावर दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. गणतंत्र दिवस, स्नेहसंमेलन अशा विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, देशभक्ती सर्वधर्मसमभाव विशेष पद्धतीने जागृत होईल असे 150 ते 200 विद्यार्थिनींचा सहभाग असलेले अति भव्य सामूहिक नृत्य प्रकार, गायन, नाटिका, एकपात्री प्रयोग, सामाजिक विषयांवरील वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आधीचे विशेष आयोजन या शाळेने केले आहे. अशी सर्व सुख सुविधा असणारी शाळा पालकांची प्रथम पसंतीची शाळा म्हणून नावलौकिक आहे. उत्कृष्ट व भविष्य वेधक दूरदृष्टी असलेला संचालक मंडळामुळे ही शाळा वटवृक्षाचे प्रमाणे नावारूपाला आली आहे. या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री उत्तम मुरकुटे सर, पर्यवेक्षिका मा. सौ नीलिमा सांगोळे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांनी यांनी मोलाची भूमिका पार पाडली. संस्थेचे मा. अध्यक्ष मा. श्री अविनाशभाऊ संगई, उपाध्यक्ष मा.श्री उल्हासभाऊ संगई, सचिव मा.श्री विवेकभाऊ संगई, सहसचिव मा.श्री प्रसादभाऊ संगई, श्री अजयभाऊ संगई व सर्व व्यवस्थापक मंडळ यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या, या यशामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरावरून शाळेचे कौतुक होत आहे.

"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 अभियानांतर्गत सीताबाई संगई कन्या शाळा अंजनगाव सूर्जी तालुक्यातून प्रथम

Share

Other News

ताज्या बातम्या