नटराज फ्रेंड्स सर्कल,,भगूर च्या वतीने महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार .

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 15/09/2024 11:33 AM

सालाबाद प्रमाणे नटराज फ्रेंड्स सर्कल,मेनरोड,भगूर च्या वतीने महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम  मोठ्या उत्साहात पार पाडला.
यंदाच नटराज फ्रेंड्स सर्कल,मेनरोड,भगूर यांचे 37 वे गणेशोत्सव वर्ष असून, पंचक्रोशीत मानाचा गणपती म्हणून मंडळाच्या बाप्पाची ओळख आहे विषेश म्हणजे मंडळाने स्थापन केलेली गणपती बाप्पाची सुभक व सुंदर मूर्ती प्रमुख आकर्षण ठरत आहे. मंडळाच्या वतीने वर्षभरात अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मंडळात हिंदु,मुस्लिम व सर्व समाजातील लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी महाआरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते दरम्यान सदर कार्यक्रमासाठी मेनरोड वरील सर्व व्यापारी व मंडळातील सर्व सभासदांचे बहुमूल्य योगदान लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या