बालमृत्यू टाळण्यासाठी न्यूमोनिया विषयी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 14/09/2024 9:33 PM


                   भारतात बालकांमध्ये होणाऱ्या न्युमोनियाची आकडेवारी पाहीली असता दरवर्षी ४० लक्ष पाच वर्षाखालील बालमृत्यु होतात. तसेच एकूण बालमृत्युच्या संख्येमध्ये १५ टक्के बालमृत्यु हे न्युमोनियाने होत असतात. या गंभीर आजाराची व्याप्ती लक्षात घेवुन केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने SAANS (Social Awareness and Action to Neutralize Pneumonia Successfully)अंतर्गत न्युमोनिया पासुन बचाव, प्रतिबंध व उपचार करण्यासाठी जनतेला याची जाणीव व्हावी व न्युमोनियापासुन बालकाचे जीव धोक्यात न घालता बालमृत्यु होण्यापासुन टाळता यावे तसेच ग्रामीण व शहरी क्षेत्रातील, गावात असणाऱ्या आशा स्वयंसेविकांना प्राथमिक लक्षणे, चिन्हाची ओळख  करण्याकरीता उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य पथक, प्रथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील कार्यरत वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व आशांचे प्रशिक्षणे आयोजित केली जातात.
                   जिल्हा प्रशिक्षण पथक द्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दि.११ सप्टेंबर २०२४ ला महिला व बाल रुग्णालयातील कॉन्फरन्स हॉल येथे सामुदायीक आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाकरीता डॉ. प्रशांत पेंदाम बालरोग तज्ञ, डॉ. रुचिता खांडरे वैघकिय अधिकारी, जि.प्र. केंद्र गडचिरोली हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षण दरम्यान न्युमोनियाचे रुग्ण, बालरुग्ण कक्षात प्रशिक्षणार्थीना पाहता आले. याकरीता डॉ. प्रशांत आखाडे वैद्यकिय अधिक्षक, महीला व बाल रुग्णालय गडचिरोली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

        वैद्यकिय अधिकारी  
जिल्हा प्रशिक्षण केंद्र गडचिरोली

Share

Other News

ताज्या बातम्या