निरोगी जीवनशैली व पर्यावरण संवर्धनासाठी रविवारी नांदेडमध्ये 5 कि.मी. सायकल रॅली;‘मेरा युवा भारत’तर्फे आयोजन; युवकांसह नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/11/2026 9:05 AM

नांदेड : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, नांदेड यांच्या वतीने ‘100 दिवस सायकल उपक्रम’ अंतर्गत रविवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरात 5 किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम, पर्यावरण संवर्धन आणि सायकल चालविण्याचे महत्त्व रुजविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

‘निरोगी शरीरासाठी सायकल चालवा, हरित उद्यासाठी पुढाकार घ्या’ आणि ‘आज सायकल चालवा, उद्याचे भविष्य उज्ज्वल करा’ या संदेशातून आरोग्य व पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. रॅलीचा शुभारंभ सकाळी 6.30 वाजता महात्मा फुले पुतळा येथून होईल. तेथून रॅली अण्णा भाऊ साठे चौकापर्यंत जाऊन पुन्हा महात्मा फुले पुतळा येथे परत येईल. रॅलीचे एकूण अंतर 5 किलोमीटर असेल.

या रॅलीमध्ये सर्व वयोगटांतील नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी सायकलस्वारांना सहभाग प्रमाणपत्र, पदक आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. इच्छुकांना Google Form Link : https://forms.gle/zCqTXSYxYmprHHAB6 वर नोंदणी अर्ज भरून अथवा कार्यक्रमस्थळी नोंदणी करता येईल. प्रत्येक सहभागीने स्वतःची सायकल व सुरक्षिततेसाठी हेल्मेट सोबत आणणे आवश्यक आहे. सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मेरा युवा भारत, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या