प्रभाग क्र. १८ व प्रभाग क्र १७
भुयारी गटार योजना कार्यान्वित करण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा चालू आहे.
प्रभागातील भुयारी गटार योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने आज पुन्हा प्रत्यक्ष पाहणी केली.
मागील चेंबर टू चेंबर टेस्टिंगदरम्यान निदर्शनास आलेली गाळाची समस्या दूर करण्यासाठी एका बाजूने गाळ उपसणे, तर दुसऱ्या बाजूने जेट रॉडिंग करून गाळाचा निचरा करणे, यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या.
उद्यापासून स्वतः उपस्थित राहून ड्रेनेज लाईनमधील ब्लॉकेज काढण्याचे व आवश्यक चाचण्या करण्याचे काम करून घेणार आहोत.
येत्या आठवडाभरात शक्य तितक्या भागातील ड्रेनेज वाहिन्या सुरळीत करून, तेथील नागरिकांना घरगुती ड्रेनेज जोडणी करण्याबाबत प्रशासनामार्फत सूचना दिल्या जाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहोत.
केवळ पंप हाऊस सुरू करणे नव्हे, तर संपूर्ण योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करून नागरिकांना तिचा लाभ मिळवून देणे, हेच आपले उद्दिष्ट आहे.
आपला नगरसेवक
अभिजीत शकुंतला दत्तात्रय भोसले
नगरसेवक तथा सदस्य, स्थायी समिती
प्रभाग क्रमांक १८
#अभिजीतभोसले #प्रभाग१८ #भुयारीगटारयोजना #सातत्यपूर्णपाठपुरावा #सांगलीमहानगरपालिका